Ad will apear here
Next
संकर्षण कऱ्हाडेची सुषमा स्वराज यांना काव्यातून आदरांजली

पुणे : ‘आईसमान वाटे त्यांचे सुष‘मा’ ऐसे नाव..’ अशा शब्दांत कवी, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुषमा स्वराज यांचे सहा ऑगस्टला रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे अचानक झालेले निधन सर्वांनाच चटका लावून गेले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी संकर्षण कऱ्हाडे याने कविता केली आहे.

संकर्षण कऱ्हाडे
सुषमा स्वराज यांनी अत्यंत खंबीरपणे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रिपद सांभाळले. भारताची प्रतिमा सुधारण्यात, अन्य देशांशी असलले संबंध सुधारण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरली. परदेशात अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांतून त्यांचे वेगळेपण दिसले. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी लोकसभेची आताची निवडणूक लढवली नाही. पदाला चिकटून राहण्याचा अट्टाहास केला नाही. त्यांची ही वृत्तीदेखील लोकांना भावली. त्यांच्या या गुणांमुळेच त्यांनी सर्वसामान्य भारतीयांच्या मनात मानाचे स्थान मिळवले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न संकर्षणने केला आहे. अगदी साध्या, सोप्या शब्दांत त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

संकर्षणची कविता

भाळी कुंकू, चेहऱ्यावर आश्वस्थणारे भाव,
आईसमान वाटे त्यांचे सुष‘मा’ ऐसे नाव 

प्रमाण शब्द, खोल विचार, ओघवती ती वाणी
चारित्र्यवान, सात्विक, शीतल, स्त्री हिंदुस्थानी..

आनंदाच्या क्षणी तुम्ही का, निरोप आमचा घ्यावा..?
असे वाटते सवेच तुमच्या सांगावा हा द्यावा ..

बंधमुक्त काश्मीर झाला, अन् अपुल्या हिमरांगा
सांगावा हा स्वर्गी जाऊन, अटलजींना सांगा..

तुम्ही दोघांनी, हिंदुस्थानी, जन्म पुन:श्च घ्यावा
राजकारणातला इमान, पुन्हा पुन्हा शिकवावा.
जय हिंद 

- संकर्षण कऱ्हाडे

(सुषमा स्वराज यांच्या वेगळेपणाच्या गोष्टी सांगणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZXFCD
Similar Posts
‘बेटियाँ तो सब की सांझी होती हैं!’ देशाच्या राजकारणात आपल्या उत्तुंग कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचा आज (सहा ऑगस्ट २०२०) पहिला स्मृतिदिन आहे. त्यांचे वेगळेपण दर्शविणाऱ्या काही गोष्टींबद्दलचा हा लेख...
अरुणास्त! भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (६६) यांचे २४ ऑगस्ट रोजी दुपारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. विद्यार्थिदशेपासूनच कार्यकर्ता म्हणून राजकारणात आलेल्या या नेत्याने आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली. या नेत्याच्या कारकिर्दीचा हा अल्प आढावा
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीप्रीत्यर्थ पुण्यात जल्लोष पुणे : भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी, ३० मे २०१९ रोजी शपथ घेतली. सलग दुसऱ्यांदा ते या पदावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याप्रीत्यर्थ पुण्यात ठिकठिकाणी मोदी समर्थकांनी जल्लोष केला.
‘भाजप’तर्फे हिमायतनगरमध्ये सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली हिमायतनगर : देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे सहा ऑगस्टला आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पक्षाच्या हिमायतनगरमधील कार्यकर्त्यांनी त्यांना सात ऑगस्ट रोजी श्रद्धांजली वाहिली. परमेश्वर मंदिर येथे हा कार्यक्रम झाला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language